Wednesday, December 14, 2016

Goat rearing, a success story - शेळी पालन, एक यशोगाथा

While improving the economic situation in rural areas, if the age old eco-friendly lifestyle prevailing there is retained, only then can it be called as sustainable development. If done properly under supervision, goat rearing can be beneficial at the household as well as the village level, which has been proved by Shri Lakshman Mormare of Mormarewadi in Nane Maval area (Maval taluka, Pune district).
In March 2014, JBGVS has provided him with one male goat and four female goats, together constituting one group. In the past two years, he took good care of the same. The result is that now he has seven male goats and 25 female goats. This tribal family, which earlier used to barely manage to earn Rs 25-30,000 per annum, now earns Rs 1,00,000. From this family of four, one person is now full time engaged in this occupation.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारताना तेथील पूर्वापार चालत आलेली पर्यावरणस्नेही जीवनपद्धती शाबूत ठेवली तरच त्याला शाश्वत विकास म्हणता येईल. योग्य देखरेखीखाली शेळी पालन केले तर घर व गाव अशा दोन्ही पातळ्यांवर फायदा होतो हे नाणे मावळ (तालुका मावळ, जिल्हा पुणे) भागातील मोरमारेवाडीच्या श्री लक्ष्मण मोरमारे यांनी सिद्ध करून दाखवलाय.
जेबीजीव्हीएस तर्फे त्यांना मार्च २०१४ मध्ये एक बोकड व चार शेळ्या मिळून एक गट देण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांत त्यांनी निट देखरेख करून या गटाचा सांभाळ केला. परिणाम असा झाला की आता त्यांच्याकडे सात बोकड व २५ शेळ्या आहेत. जे वनवासी कुटुंब पूर्वी हलाकीच्या परिस्थितीत मोलमजुरी करून जेमतेम रु २५-३०,००० वार्षिक उत्पन्न कमवत होते, तेच आता रु १,००,००० पर्यंत कमवत आहेत. कुटुंबातील चार सदस्यांपैकी एक जण आता हा व्यवसाय पूर्णवेळ करत आहे.

No comments:

Post a Comment